You are currently viewing जेष्ठ भजनी बुवा गंगाराम साटम यांचा त्रिंबक येथे सन्मान!अखंडित भजन सेवे बद्दल व्यक्त केले आभार

जेष्ठ भजनी बुवा गंगाराम साटम यांचा त्रिंबक येथे सन्मान!अखंडित भजन सेवे बद्दल व्यक्त केले आभार

मसुरे /-

त्रिंबक बागवेवाडीतील वयोवृध्द ग्रामस्थ व जेष्ठ भजनी बुवा श्री. गंगाराम साटम यांचा बागवेवाडीतील गौरीच्या मांडावर गौरी पूजनाचे शुभ दिनी अखंडित ४२ वर्षे भजन सेवा उत्तम रित्या दिल्याबद्दल वाडीतील ग्रामस्थ प स सदस्य अशोक बागवे, मा. शि. स. अध्यक्ष प्रताप बागवे, सुरेंद्र सकपाळ, व बाळा बागवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी अशोक बागवे, प्रताप बागवे, शंकर बागवे यांनी गंगाराम यांच्या अखंडित सेवेबद्दल माहिती देऊन यापुढेही नवीन बुवांना त्यांनी मार्गदर्शन करावे व अखंडित सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन श्री सुरेंद्र सकपाळ यांनी तर आभार बाळा बागवे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा