You are currently viewing कोचरे येथे बीएसएनएल टॉवर साठी जमीन देणाऱ्या तेली यांचा सत्कार

कोचरे येथे बीएसएनएल टॉवर साठी जमीन देणाऱ्या तेली यांचा सत्कार

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे गावामध्ये बीएसएनएल टॉवर आता कार्यान्वित झाला असून यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचा कोचरे गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या टॉवर साठी जमीन देणाऱ्या जमीन मालक मनोहर तेली यांचा शाल, श्रीफळ, पुष्प व शिवाजी महराजांची प्रतिमा भेट देऊन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार दिपक केसरकर, गटनेते नागेंद्र परब, जि.प. सदस्य अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, बीएसएनएल चे अधिकारी, सरपंच साची फणसेकर, निवती सरपंच भारती धुरी, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, निवृत्त नायब तहसीलदार सुभाष चौधरी,  ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा पाटकर, पूजा गोसावी, सरस्वती राऊळ, स्वरा हळदणकर, सोसायटी चेअरमन ब्रिजेश तायशेट्ये, उपविभाग प्रमुख वसंत साटम, केळुस माजी सरपंच योगेश शेट्ये, म्हापण उपसरपंच अशोक पाटकर, ज्येष्ठ शिवसैनिक बाळा हंजणकर, शाखा प्रमुख आपा राऊळ, भोगवे सोसायटी चेअरमन चेतन सामंत, ग्रामसेवक प्रविण भोई यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते. 

अभिप्राय द्या..