You are currently viewing कोचरे आरोग्य उपकेंद्राला मिळणार योग्य प्रमाणात लस साठा.;सरपंच साची फणसेकर

कोचरे आरोग्य उपकेंद्राला मिळणार योग्य प्रमाणात लस साठा.;सरपंच साची फणसेकर

वेंगुर्ला /-


तालुक्यातील कोचरे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी कोरोनाच्या लस वाढवून मिळण्याबाबत सरपंच साची विकास फणसेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत याना निवेदनाद्वारे विनंती केली होती. या मागणीला यश येऊन कोचरे प्राथमिक उपकेंद्राला वाढीव लस मिळण्यास सुरुवात झाली आहे.कोचरा आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कोचरे मायने, मेढा- निवती, श्रीरामवाडी शेळपी असा मोठा भाग येतो. या भागातील जवळपास ५० ते ६० टक्के नागरिकांचे पहिल्या सत्राचे लसीकरण अद्याप पर्यंत झालेले नाही.सध्या आरोग्य उपकेंद्राला उपलब्ध होणाऱ्या लसींची संख्या पाहता ती अगदी कमी असल्याने अनेक जणांना लस मिळत नाही व लसीकरण केंद्रावर गर्दी होते. तर लस न मिळल्याने बऱ्याच लोकांना लांब अंतरावरून आल्याने परतून जावे लागते. त्यामुळे हे डोस वाढवून मिळावेत अशी मागणी सरपंच साची फणसेकर यांनी केली होती. दरम्यान या मागणीला यश आले असुन कोचरे आरोग्य उपकेंद्राला अधिकचा डोस पुरवठा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मायने महसूल गावाला लवकरच गणेश चतुर्थी संपल्यानंतर तात्काळ डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती सरपंच फणसेकर यांनी दिली.

अभिप्राय द्या..