नगराध्यक्ष संजू परब यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेत,एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पत्र देत वेधले लक्ष !

नगराध्यक्ष संजू परब यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेत,एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पत्र देत वेधले लक्ष !

सावंतवाडी /-

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले भाजपाचे माजी खासदार तथा फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांची सावंतवाडी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी भेट घेत सावंतवाडी शहरात एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पत्र देत चौकशीची मागणी केली. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.गेल्या काही वर्षात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे झालेल्या कामांमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात नगराध्यक्ष या नात्याने संजू परब यांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषणही छेडले होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही तक्रार केली होती. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी संजू परब यांनी यावेळी पत्राद्वारे केली.
 यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, नगरसेवक आनंद नेवगी, बांदा सरपंच अक्रम खान यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

अभिप्राय द्या..