You are currently viewing वागदे कसवण तळवडे आंब्रड पोखरण कुंदे मार्गावरील एसटी वाहतूक सुरू करा.;शिवसेनेची एसटी विभाग नियंत्रकांकडे मागणी..

वागदे कसवण तळवडे आंब्रड पोखरण कुंदे मार्गावरील एसटी वाहतूक सुरू करा.;शिवसेनेची एसटी विभाग नियंत्रकांकडे मागणी..

कणकवली /-

वागदे कसवण तळवडे मार्गाचे भुस्कलन होऊन रस्ता खचल्याने या मार्गावरील एसटी वाहतूक बंद होती. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याची डागडुजी करण्यात आली असून रस्ता वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे. शिवसेना कळसुली विभागप्रमुख रुपेश आमडोस्कर, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, आबा मुंज, यांनी आज एसटीचे प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांची भेट घेऊन वागदे कसवण तळवडे आंब्रड पोखरण कुंदे मार्गावरील एसटी वाहतूक पुन्हा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.त्यावर रमेश कांबळे यांनी एसटी विभागामार्फत शुक्रवार ३ सप्टेंबर रोजी तात्काळ तपासणी वाहन पाठवून सदर मार्गाची तपासणी करून एसटी फेरी सुरू करण्याचे आदेश वाहतूक नियंत्रकांना दिले आहेत.यावेळी एसटी अधिकारी सौ.कुबडे उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..