You are currently viewing सजली बाजारपेठ आतुरता फक्त गणरायाच्या आगमनाची…

सजली बाजारपेठ आतुरता फक्त गणरायाच्या आगमनाची…

गणेश चतुर्थी एक खास रिपोर्ट लोकसावंदच्या प्रेक्षकांसाठी..

दोडामार्ग /-

सजल्या बाजारपेठा आता आतुरता फक्त गणरायाच्या आगमनाची गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली असून सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग मध्ये ठीक-ठिकाणी व्यापारी वर्ग उत्साहात आपाल्या दुकानांन मध्ये सजावट करताना दिसत आहे,

हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा मानाला जाणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर असून गेल्या दोन वर्षात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कडक निर्बंध लादण्यात आले होते यामुळे अत्याआवश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती परंतु यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहता शासन निर्णयांमध्ये थोडीशी शिथिलता करण्यात आली असल्याने बाजारपेठा सजलेल्या दिसत आहेत, सिंधुदुर्ग हा कोंकण वासीयांचा जिल्हा असून कोकणात मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो आणि व्यापारी वर्गांवर देखील हा सण भरभराटीचा ठरतो खरेदी विक्री या सणात मोठ्या प्रमाणात केली जाते कोरोना मुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले असल्याने या वर्षी मात्र व्यापारी वर्गात उत्साह दिसत आहे कारण कोकणातील व्यापारी मात्र वर्षभरापेक्षा जास्त नफा हा गणेश चतुर्थीलाच मिळवत असल्याने आता अवघ्या काही दिवसांवर गणरायाचे आगमन होणार असल्याने सिंधुदुर्ग मधील व्यापारी दुकानातील सजावट करत आता मात्र गणराया इतकीच आपल्या ग्राहकांची आतुरतेने वाट पाहत आहेत व्यापारी वर्गासाठी प्रत्येक ग्राहक हा गणरायाचं बनून येणार असल्याचा त्यांच्यात उत्साहा दिसत आहे व्यापारी वर्ग हा गणेश चतुर्थी ला आपल्या घरातील सजावटी पेक्षा दुकानातील सजावट मोठ्या प्रमाणात करत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत असतो सजलेल्या बाजारपेठा पाहता सिंधुदुर्ग वासीयांमध्ये गणरायाच्या आगमनची उत्सुकता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

अभिप्राय द्या..