आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत २१ एनएचएम आरोग्य सेविका यांची पदे कमी करू नये; शिक्षण आरोग्य सभापती अनिषा दळवी..

आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत २१ एनएचएम आरोग्य सेविका यांची पदे कमी करू नये; शिक्षण आरोग्य सभापती अनिषा दळवी..

वेळ पडल्यास रस्त्यावर उतरत आंदोलन करू..

दोडामार्ग /-

आरोग्य विभागात सन 2005 साली सुरु झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत सिंधुदूर्ग जिल्हात आज 556 तर राज्यात 25000 अधिकारी व कर्मचारी विविध पदावर गाव-तालुका-जिल्हा ते राज्यस्तरावर मागील 15 वर्षापासून एनएचएम अर्तगत कंत्राटी तत्वावर कार्यरत आहोत. कोरोना विषाणुजन्य आजाराचा प्रार्दुभाव सुरु असतानाही जिवाची पर्वा न करता आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत निष्ठापूर्वक काम करून जनतेस चांगल्या आरोग्य सेवा देण्याचे काम नियमितपणे करीत आहेत.
मा.आयुक्त,आरोग्य सेवा व संचालक एनएचएम ,मुंबई यांनी काल दिलेल्या पत्रानुसार या अभियानातील मागील 15 वर्षे कार्यरत असलेल्या २१आरोग्य सेविका यांना उपकेंद्र इमारती मध्ये कोवीड काळातील सन २०२०-२१मध्ये प्रसुती न केल्याचे व सदर पदांकरीता अचानकपणे वेतन मंजुर न झाल्याची कारणे दाखवत कमी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहे. हे कर्मचारी सध्या जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करत असल्याने सरकारने खालील बाबींचा विचार करुन सदरची पदे कमी न करीता अनुभव व कौशल्याच्या आधारे जिल्हातील रिक्त पदा वर यांचे समायोजन करावे तसेच वयाची अट शिथिल करून भरती प्रक्रियेत ४०% आरक्षण द्यावे.व खालील बाबीचा विचार करून परिपत्रक रद्द करावे.
मागील वर्षी कोवीड सारखा महाभयंकर आजाराने राज्यात व जिल्हात थैमान घालत असताना उपकेंद्र स्तरावर प्रसुती करणे किती जिकरीचे आहे हे प्रशासनास समजत नाही हे र्दुदैव आहे.
सदरची पदे कमी न करता त्याच तालुक्यात किवा जिल्हातील जास्त लोकसंख्या असलेल्या उपकेंद्र ठिकाणी तात्काळ वर्ग करुन मिळावीत व एकही पद कमी करण्यात येऊ नये.
या करिता मी आरोग्य सभापती व संपूर्ण जिल्हा परिषद एन एच एन कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत. वेळप्रसंगी आंदोलन करावयाचे झाल्यास आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करू परंतु एकही पद कमी होऊ देणार नाही.

तसेच मा. केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे साहेब मा. आमदार नितेश राणे साहेब याच्या मार्फत या सर्व कर्मचाऱ्यांना नक्कीच न्याय मिळवुन देणार आहोत अशी माहिती प्रेसनोट द्वारे शिक्षण आरोग्य सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉ. अनिषा दळवी यांनी दिले आहेत.

अभिप्राय द्या..