केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्या जन आशीर्वाद यात्रा कार्यक्रमात विविध संस्थांच्यावतीने होणार नागरी सत्कार..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्या जन आशीर्वाद यात्रा कार्यक्रमात विविध संस्थांच्यावतीने होणार नागरी सत्कार..

वेंगुर्ला /-


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वेंगुर्लेत रविवार २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या “जन आशीर्वाद यात्रा ” कार्यक्रमात केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर वेंगुर्लेत प्रथमच येणाऱ्या नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत व विविध संस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी सायंकाळी ६ वाजता शिरोडा नाका येथे रेडी जिल्हा परिषद गटातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार, ६:३० वाजता मांडवी गार्डन येथे स्वागत व वेंगुर्ला व्यापारी संघटना, वेंगुर्ला सरपंच संघटना, वेंगुर्ला ओबीसी संघटना, वेंगुर्ला मुस्लिम संघटना, मराठा समाज,महिला बचत गट प्रतिनिधी व पदाधिकारी वेंगुर्ला, शेतकरी सन्मान लाभार्थी,देवस्थान कमिटी,ख्रिस्ती समाज बांधव,कुंभार समाज,उज्वला गॅस योजना लाभार्थी,पंतप्रधान आवास योजना लाभार्थी ,आत्मनिर्भर योजना (पथ विक्रेते),किरकोळ व्यापारी,गाबीत समाज,गिरणी कामगार प्रतिनिधी,सुवर्णकार प्रतिनिधी व बार असोसिएशन यांच्यावतीने केंद्रीय मंत्री राणे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे व उपस्थित मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.तर ७ वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केटचे उदघाटन तर ७:३० वाजता मठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे.या यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व स्मिता दामले यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..