You are currently viewing युवा फोरम भारत संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा..

युवा फोरम भारत संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा..

कुडाळ /-

युवा फोरम भारत संघटना ही चौथ्या वर्षात पदार्पण करत असून आज दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी युवा फोरम भारत संघटनेचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळेस युवा फोरम भारत संघटनेच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन परुळेकर मॅडमच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ऍड. हितेश कुडाळकर, पूजा खानोलकर, सिद्धी सावंत, भूषण मेस्त्री, संकेत राणे, गणेश सावंत व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.

त्यानंतर, सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकिदो असोसिएशन सावंतवाडी यांच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येते समाजमंदिर मध्ये स्वसंरक्षणचा कार्यक्रम घेण्यात आला व युवक युवतींचा खूप छान प्रतिसाद मिळाला. या वेळेस सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकिदो असो. सावंतवाडीचे मुख्य प्रशिक्षक, संस्थापक व सचिव माननीय श्री. वसंत जाधव सर, प्रशिक्षक – प्रतीक्षा गावडे मॅडम, प्रशिक्षक – संदेश पंडित सर व युवा फोरम भारत संघटनेचे स्वयंसेवक हर्षल देसाई, अनुप जाधव, हार्दिक कदम, प्रतिक्षा कोंडस्कर, विपुल भावे, सौरभ शिरसाट, हेमंत, श्रेयश, निधी जोशी, भूषण अनावकार, सुयश घाटकार, सिद्धार्थ वर्डम व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.

त्यानंतर काळशे येते युवा फोरम भारत संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला होता. या वेळेस डॉ.बेळनेकर, डॉ. जोशी, डॉ. कलांबलेकर, व युवा फोरम भारत संघटनेचे स्वयंसेवक मिली मिश्रा, श्रीशा बांदिवडेकर, विनोद निकम, केतन शिरोडकर, वेदान्त नवंगुल, रोहित अटक, भूषण गावडे, विवेक राजमाने, गौरव पालव, विराज चिंदरकर, राधाकृष्ण भोगते, शुभम सिंदगीकर व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा