You are currently viewing तेजस बांदिवडेकर यांना जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..

तेजस बांदिवडेकर यांना जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..

वेंगुर्ला /-


दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कडून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. या चालू वर्षी तो पुरस्कार वेंगुर्ले तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं १ चे उपशिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना जाहीर झाला आहे.
बांदिवडेकर हे गेली १७ वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांचे एम. ए. डी. एड. शिक्षण असून त्यांनी आपल्या शिक्षक सेवेची सुरुवात तुळस येथील रेवटी शाळेमधून केली. त्यांचा शिष्यवृत्तीचा वजराट पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आज पर्यंत त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली ३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक बनविले आहे. ते आपली शिक्षकी सेवा बजावत असताना पुस्तकी शिक्षणाबरोबरच शाळाबाह्य शिक्षण देतात. तसेच आपल्या शाळेत सहशालेय कार्यक्रमही राबवितात. वेगवेगळ्या स्पर्धा प्रकारांमध्ये राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतात व यशस्वीही करतात. त्यांनी वजराट शाळा नं – १ ला लोकसहभागातून भौतिक सुविधा प्राप्त करून देत आदर्श शाळेचे स्वरूप दिले आहे. यापूर्वी त्यांना अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा