मळगांव इंग्लिश स्कूल प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकलचे वितरण..

मळगांव इंग्लिश स्कूल प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकलचे वितरण..

सावंतवाडी /-

माजी केंद्रीय मंत्री खा.सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने गोवा विमानतळ प्राधिकरण सीएसआर निधीतून मळगांव इंग्लिश स्कूल या प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या उपस्थितीत सायकलचे वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मळगांव सरपंच सौ.स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र परब, संस्थेचे संचालक रामचंद्र केळुसकर, स्थानिक कमिटी सदस्य मनोहर राऊळ, पत्रकार सचिन रेडकर, ग्रा.पं. सदस्या निकिता बुगडे, सुभद्रा राणे, दीपक जोशी, अर्जून राऊळ, मुख्याध्यापक वैजनाथ देवण, पर्यवेक्षिका सौ. श्रद्धा सावंत, शिक्षक संदीप कारीवडेकर, शिक्षिका आनंदी मोर्ये आदी उपस्थित होते.
यावेळी जन शिक्षण संस्थानच्यावतीने भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांनी जन शिक्षण संस्थेच्या कार्य कामकाजाचा आणि सायकल वाटप करण्याचा मुख्य उद्देश उपस्थितांना सांगितला. विद्यार्थिनींना मिळालेल्या सायकलचा उपयोग आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी व शारीरिक दर्जा वाढविण्यासाठी करावा तसेच आज या दहा सायकलमधून आम्ही या प्रशालेत सायकलींची सायकल बँक उभारून भविष्यातही इतर होतकरू विद्यार्थीनींना त्याचा उपयोग व्हावा. प्रशालेच्या इतर गरजांसाठीही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप कारीवडेकर यांनी तर आभार पर्यवेक्षिका सौ. श्रद्धा सावंत यांनी मानले.
फोटो

अभिप्राय द्या..