You are currently viewing वेंगुर्ले तालुका वकील बार असोसिएशन तर्फे अॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार

वेंगुर्ले तालुका वकील बार असोसिएशन तर्फे अॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुका वकील बार असोसिएशन तर्फे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल चे नुकतेच उपाध्यक्षपदी विराजमान झालेले सिंधुदुर्ग चे सुपुत्र अॅड. संग्राम देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अॅड. राजेंद्र रावराणे,ऍड.विवेक मांडकुलकर, ऍड.अमोल सामंत, वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.जी. जी. टांककर, ऍड.एन जे गोडकर, ऍड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, सचिव ऍड. प्रकाश बोवलेकर, ऍड.दिनकर वीर, ऍड.ओगले,ऍड. पराडकर,ऍड. मनिष सातार्डेकर, ऍड.प्रथमेश नाईक, ऍड.प्रसाद सामंत,ऍड. धनंजय झांटये,ऍड.तेजश्री कांबळी, ऍड.शुभांगी सडवेलकर, ऍड.महाले,ऍड.पूनम नाईक,ऍड.श्रद्धा बाविस्कर,ऍड. अक्षदा राऊळ, ऍड.तेजश्री झांटये ,कु.हर्षदा कुडव,कु. श्रद्धा राऊळ आदी उपस्थित होते.यावेळी ऍड.गोडकर, सूर्यकांत प्रभूखानोलकर,जी. जी. टांककर यांनी शुभेच्छा दिल्या.ऍड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी ऍड. संग्राम देसाई यांना शुभेच्छा दिल्या. महिला वकिलांसाठी सुसज्ज स्वतंत्र बाररूम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.यावेळी ऍड. संग्राम देसाई यांनी माझा सत्कार हा माझा एकट्याचा नसून तो तुम्हा सर्वांचा आहे. महिला वकिलांना बाररुम मिळवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असे सांगितले. प्रकाश बोवलेकर यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..