लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी नगरसेवक तथा ज्येष्ठ वकील ॲड.परिमल नाईक यांची निवड..

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी नगरसेवक तथा ज्येष्ठ वकील ॲड.परिमल नाईक यांची निवड..

सावंतवाडी /-


लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी नगरसेवक तथा ज्येष्ठ नोटरी ॲड. परिमल नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली. पदग्रहण व शपथ विधी कार्यक्रमात मालवणचे ला. गणेश प्रभूलकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी ज्येष्ठ लायन केशव फाटक तसेच नवीन कार्यकारिणी पदाधिकारी सचिव ला. अमेय पई, उपाध्यक्ष विद्याधर तावडे, उपाध्यक्ष ला. दत्तू नार्वेकर, खजिनदार ला. प्रसाद राऊत, गजानन नाईक, बोर्डेकर आदी उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लबचे नुतन अध्यक्ष ॲड.परिमल नाईक यांनी पर्यावरण, कुपोषण निर्मूलन, ज्येष्ठ नागरीक कल्याण यांना प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ ला. गजानन नाईक यांनी केले.

अभिप्राय द्या..