सावंतवाडी /-


पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या खेळत्या भांडवलाचा परतावा वेळेत पूर्ण केलेले पथ विक्रेते हिरा लाखे व धनवंती शेंडगे या दोघा पथ विक्रेत्यांना नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आलेयावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अभियान व्यवस्थापक एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.


कोरोना महामारीमुळे बहुतेक व्यवसाय डबघाईला आले आहेत. हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांच्या उपजिवीकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पथ विक्रेत्यांना आपले व्यवसाय पुन्हा सुरु करता यावेत यासाठी केंद्रशासनाने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरु करत पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा योजना राज्यात सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत वीस हजार रुपये इतक्या दुसऱ्या पतपुरवठ्याचा लाभ देण्यात येतो.सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या पुढाकारातून या योजनेअंतर्गत सावंतवाडीतील पथ विक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये इतक्या खेळत्या भांडवलाचा पुरवठा करण्यात आला होता. त्याची परतफेड मुदतीत केलेले पथ विक्रेते हिरा लाखे व धनवंती चेंडके यांना नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. इतर पथ विक्रेत्यांनीही आपल्या कर्जाची वेळेत परतफेड करुन दुसऱ्या पथ पुरवठ्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन नगराध्यक्ष परब यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page