केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कुडाळ येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध !

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कुडाळ येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध !

कुडाळ /-

राहुल गांधी हे काँग्रेसचे चांगले नेतृत्व आहे.ते संयमी आणि शांत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून करत आहोत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यभागी कुडाळ येथे त्यांचा पुतळा दहन करणार असतो मात्र मनाई आदेशाचा भंग होऊ नये म्हणून आम्ही केवळ निषेध करून त्यांच्या या कृतीचा धिक्कार करतो, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ६५ वर्षे काँग्रेसची सत्ता होती या पासष्ट वर्षात देशाला महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला स्वातंत्र्यपूर्व काळात देशाची अत्यंत बिकट अवस्था होते अशा वेळी देशाचे नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसला मिळाली राहुल गांधी काँग्रेसचे हुषार नेतृत्व आहे दानवे सारखे मंत्र्यांनी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला व अशा वक्तव्याने ते आपली रोजीरोटी चालवतात विरोधकांनी देशाला गरिबीच्या खाईत टाकले आहे. काँग्रेस पक्ष बूथ कमिटी या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे ते म्हणाले त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून चांगली साथ मिळणार आहे नारायण राणेंच्या वक्तव्याबाबत बोलताना गावडे म्हणाले, नेतृत्वाने काय बोलावे हे सांगणे एवढा मी मोठा नाही परंतु वक्तव्य करताना प्रत्येकाने भान राखण्याची गरज आहे. आपण जे बोलतो वागतो तेच संस्कार इतरांनी घ्यावेत का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांच्या सोबत युवक काँग्रेसचे माजी जिल्ह्या अध्यक्ष अभय शिरसाट ,कुडाळ काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय प्रभू अन्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..