मालवण गवंडीवाडा येथील तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह सापडला..

मालवण गवंडीवाडा येथील तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह सापडला..

मालवण /-

मालवण गवंडीवाडा येथील शुभम अरुण शिंदे या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बंद घराच्या ओसरीच्या वाश्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. याबाबत मालवण पोलिसात शुभम याचे वडील अरुण शिंदे यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण गवंडीवाडा भागात राहणारा शुभम अरुण शिंदे हा आपली पत्नी दोन मुले आई वडीलांसमवेत राहत होता तो मच्छिमारी करायचा. काल रात्रौ ८:३० वाजता शुभम हा घरी परतल्यानंतर काहीवेळ वडिलांशी त्याने संवाद साधला त्यानंतर घरातील मंडळी झोपी गेली. आज सकाळी शुभम याची आई ही कामानिमित्त घराबाहेर आल्यानंतर तिला शेजारच्या बंद घराच्या ओसरीला शुभम याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत अरुण विठ्ठल शिंदे यांनी मालवण पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ हेमंत पेडणेकर हे अधिक तपास करत आहेत.

अभिप्राय द्या..