You are currently viewing कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते उदय आळवे यांचे निधन.;क्रीडा, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी..

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते उदय आळवे यांचे निधन.;क्रीडा, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी..

कणकवली /-

कणकवलीतील क्रीडा, सामजिक क्षेत्रात गेली कित्येक वर्षे सक्रिय असलेले उदय मनोहर आळवे (54) यांचे गुरुवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. उदय आळवे यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना गेले महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कणकवली नाथ पै नगर येथील रहिवासी असलेले उदय आळवे हे कणकवलीतील यंगस्टार मित्र मंडळाचे गेली कित्येक वर्षे अध्यक्ष होते. यंगस्टार मित्र मंडळाच्या माध्यमातून भरविण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असे . तसेच उदय आळवे हे कणकवली शहरातील भजपाचे बूथ अध्यक्ष, भालचंद्र महाराज संस्थानाचे सल्लागारही होते. तसेच कँझुमर्स सोसायटी संचालक, म्हणूनही ते कार्यरत होते.कणकवलीचे माजी सभापती व जेष्ठ समाजवादी विचारसरणीचे नेते मनोहर उर्फ मामा साळवे यांचे सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी भाऊ, पुतणे, वहिनी असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..