शिवसेनेच्या वेंगुर्ला च्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत तहसिलदारांना निवेदन..

शिवसेनेच्या वेंगुर्ला च्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत तहसिलदारांना निवेदन..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल होण्याबाबत वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, बाळा दळवी,सचिन देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, युवा सेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, प्रकाश गडेकर, दादा सारंग,अण्णा वराडकर, वेदांग पेडणेकर, तेजस भगत, संदीप केळजी, आनंद बटा, गौतम मुळे,दिलीप राणे,डेलीन डिसोजा, राहुल नरसाळे आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी गुन्हा दाखल करावा व त्यांना
तातडीने अटक करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पालन करण्यात यावे अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व जन आशीर्वाद यात्रा रोखण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..