You are currently viewing अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वरच्या कोळवली गावातून झाली अटक..

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वरच्या कोळवली गावातून झाली अटक..

रत्नागिरी /-

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वरच्या कोळवली गावातून पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांनी राणेंविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी खुद्द रत्नागिरीचे एसपी राणेंना अटक करण्यासाठी संगमेश्वर येथे पोहोचले आणि राणेंना अटक करण्यात आली. आणि आता पोलिसांचा ताफा रवाना झाला आहे. परंतु पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट नसल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली आहे. राणेंची बीपी आणि शुगर वाढल्यामुळे राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. गाडी अडवण्यासाठी राणेंच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांसमोर झोपून गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिस त्यांना हटवून नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत. एकंदर, संगमेश्वर मधील वातावरण अतिशय गरम झाले असून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..