You are currently viewing कुडाळमद्धे केंद्रीय मंत्री ना.राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न विरोधात घोषणाबाजी..

कुडाळमद्धे केंद्रीय मंत्री ना.राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न विरोधात घोषणाबाजी..

कुडाळ /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ शिवसेना शाखा येथे युवासेनेने आंदोलन केले.यावेळी युवासेनेने राणेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुडाळ येथे आंदोलकांकडून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडत आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनवर नेले.मुबंईहून निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. याविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ राणेंना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्ताचे आदेश निघाले.

अभिप्राय द्या..