कुडाळ येथे सुरू असलेले कोवीड सेंटर बंद करू नये.;कुडाळ तालुका व्यापारी महासंघाची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

कुडाळ येथे सुरू असलेले कोवीड सेंटर बंद करू नये.;कुडाळ तालुका व्यापारी महासंघाची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

कुडाळ /-

कुडाळ येथील महीला रुग्णालय येथे सुरू असलेले कोवीड सेंटर हे,सध्या बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत याच दरम्यान आज कुडाळ तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी कुडाळ तहसीलदार यांची भेट घेऊन व्यापारी महासंघाने चर्चा केली आहे.आणि कोणत्याही परीस्थितीत महिला बाल रुग्णालयात तील कोव्हिडं सेन्टर हे बंद होता कामा नये यासाठी कुडाळ व्यापारी संघटनेमार्फत कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी कुडाळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या सोबत, उपाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव भूषण मटकर, राजन नाईक, प्रसाद शिरसाट, जयराम डिगसकर, राजेश मांजरेकर, निकू म्हाडेश्वर , महेश ओटवणेकर हे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..