नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी.;खा.विनायक राऊत.

नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी.;खा.विनायक राऊत.

मुंबई /-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करून अवघ्या महाराष्ट्राचा अपमान करणा-या नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. दरम्यान राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आता शिवसैनिक निषेध करतील.आणि येणाऱ्या निवडणूक त्यांना नक्कीच पाणी पाजतील असाही इशारा त्यांनी दिला आहे. श्री राणे यांनी केलेल्या विधाना नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार नितेश राणे यांनी वाघाची गुन्हा असा उल्लेख केला होता. परंतु वाघाची नाही तर ती कोल्ह्याची गुहा आहे. असाही पलटवार श्री राऊत यांनी केला आहे.

अभिप्राय द्या..