You are currently viewing मी,कोणताही गुन्हा केलेला नाही, मला अटक नोटीस नाही;जन आशीर्वाद यात्रा जोमाने सुरूच राहणार ना.राणे

मी,कोणताही गुन्हा केलेला नाही, मला अटक नोटीस नाही;जन आशीर्वाद यात्रा जोमाने सुरूच राहणार ना.राणे

कार्यालय कोण फोडत असेल तर तशाच पद्धतीने उत्तर देऊ.;नारायण राणे

चिपळूण /-

मी कोणत्याही पद्धतीचे चिथावणीखोर भाषण केलेलं नाही, माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे मला माहीत नाही,मी कोणाला भीत नाही, शिवसेनेला भीक घालत नाही, माझी जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे दिली.दरम्यान मी केंद्रीय मंत्री आहे. मला अटक करण्याचे आदेश द्यायला आयुक्त काय राष्ट्रपति की पंतप्रधान आहेत?, असा उलट सवाल करीत आमची कार्यालय कोण फोडत असेल तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देऊ. शिवसेनेत आता खरे शिवसैनिक राहिले नाहीत ज्या मुंख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहीत नाही ते देश द्रोही नाही का असा सवाल पत्रकारांना उपस्थित केला.

अभिप्राय द्या..