You are currently viewing आम्हाला भूलथापा मारून पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.;शिवसेनेचे राजू राणे यांचा भाजपला ईशारा

आम्हाला भूलथापा मारून पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.;शिवसेनेचे राजू राणे यांचा भाजपला ईशारा

कणकवली /-

आमचा ८०% समाजकारण व २०% राजकारण हा पिंड आहे. त्यामुळे आम्हाला भूलथापा आमिषे किंवा आश्वासने देऊन पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.ती तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना आहेत असे प्रत्युत्तर शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू राणे यांनी दिले आहे.
शिवसेनेने भाजपा कार्यकर्त्यांचा प्रवेश हा भूलथापा देऊन करून घेतला असल्याचा आरोप भाजपच्या वतीने झाल्यानंतर त्यांच्या आरोपांचे राजू राणे यांनी खंडन केले आहे. यावेळी भास्कर राणे, मारुती सावंत,गणेश राणे, रोहित राणे,उपस्थित होते
यावेळी बोलताना राजू राणे म्हणाले की, नुसती नावामागे पदे लावून नाही आमच्या एवढी हिम्मत आहे की गेल्या ३ वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मा.पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखालीआम्ही गावात आणून योग्य प्रकारे नियोजन करून पूर्ण करून घेतली.परंतु कावीळ झालेल्यांना सर्व पिवळेच दिसते.आपल्या नेत्यांकडून गावच्या विकासासाठी निधी न आणता किंवा आणलेल्या निधीचे कौतुक न करता झालेल्या विकास कामांवर तक्रारी करणे हेच तुमच्या आवडीचे काम . आम्हास ग्रामपंचायतीच्या आडून कामे करायची आवश्यकता आमच्यात समोरासमोर लढण्याची ताकत आहे. कामांच्या प्रति कशा प्रकारे आहेत याबाबत आपण तक्रारी केल्या नंतर संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या आहेत

आम्ही गेल्या 3 वर्षात विकास कामा व्यतिरिक्त बचत गटांना हळद रोपे, शेतकऱ्यांना काजू, बियाणे, खत वाटप असे विविध सामाजिक कार्य ही करत आहोत. हळवल गाव एक सुसंस्कृत गाव आहे .त्यामुळे कोण चांगले काम करतो त्यांच्या गाव नेहमी पाठीमागे राहतो.आता तुम्हीच विचार करा व मागे वळून पहा तुमच्या मागे किती आहेत.

किती कोणाला मतदान मिळेल हे गावातील सुज्ञ मतदार व ग्रामस्थ ठेवतील.घाणेरडे राजकारण करणे हा आमचा पिंड नाही त्यामुळे माझ्या हाताला धरून राजकारणात आलेल्यानी मला शिकवू नये ते कशाप्रकारे करायचे ते मला चांगले माहीत आहे. हे मी यापूर्वी दाखवून दिले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा