You are currently viewing श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चे एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये अभिनंदनीय यश..

श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चे एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये अभिनंदनीय यश..

चौके /-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे च्या दोन विद्यार्थ्यांनी आपले गुणवत्ता यादीमध्ये स्थान निश्चित केले आहे. प्रशालेचे विद्यार्थी कु. मेहुल अजित हडकर व कु. तेजस्विनी सत्यविजय परब या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या परीक्षेत प्रशालेतून 12 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दोन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तरी सदर च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस प्रतिवर्षी १२,००० प्रमाणे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.

प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर वालावलकर यांनी ‘विद्यार्थ्यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा यशाची परंपरा कायम ठेवली’, असे गौरवोद्गार काढले. यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. पेडणेकर श्री. परब सर, सौ. माईनकर, सौ. आचरेकर, सौ. कुडतरकर व श्री. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांचे संस्था सचिव केशव सावंत व संचालक योगेश राऊळ व विषय तज्ञ सौ. नार्वेकर यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे काळसे व धामापुर ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..