वेंगुर्ला /-


जुना ई लिलाव रद्द करून ज्यांनी ज्यांनी ई लिलावात भाग घेतला त्यांची अनामत व ई लिलाव फी परत करून नविन संपूर्ण प्रक्रिया राबवावी, मंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासू नयेत तसेच जुन्या त्या १५ गाळेधारकांना त्याच जागेत शासनाच्या नियमानुसार गाळे देऊन सहकार्य करावे. अन्यथा आम्हाला आत्मदहन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल व त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहणार, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे आज सोमवारी वेंगुर्ला तालुका व्यापारी संघातर्फे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांना देण्यात आला आहे.
वेंगुर्ले नगर परिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या तळमजल्यावरील १५ दुकान गाळ्यांच्या ई-लिलाव संबंधी आज व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच आपल्या मागणीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.नगरपरिषद प्रशासनाने २०/०८/२०२१ ते ०३/०९/२०२१ पर्यंत ई लिलाव फी रु. १०००/- व अनामत रक्कम रु. ५००००/- (पन्नास हजार मात्र) व अटि-शर्ती मान्य करून ई-लिलावामध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु दि. ०६/०८/२०२१ रोजी श्री. एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉलवर झालेल्या बैठकीत आपणांस जुलै मधील ई-लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु सदर आदेशाचे आपलेकडून उल्लंघन केल्याचे निदर्शनास येत आहे.
विकासाच्या नावाखाली त्या १५ गाळेधारकांनी आपले गाळे खाली केले होते. त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली. मात्र त्या खोलात आम्हाला जायचे नाही. ते १५ ही व्यापारी स्थानिक असून त्यांना पुन्हा गाळे मिळावेत ही आमची मागणी आहे. नियमानुसार अटी व शर्ती ना अधीन राहून ते गाळे घेणार आहेत. तसेच नगरपालिका म्हणजे फायद्याचा विचार करणारा बिल्डर नाही ती एक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांचा आपणच विचार करावा अशी मागणी यावेळी व्यापारी यांचे वतीने करण्यात आली.यावेळी वेंगुर्ला तालुका व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर, व्यापारी संघ जिल्हा प्रतिनिधी राजेश शिरसाट, वेंगुर्ले व्यापारी सदस्य राजन गावडे, अमर दाभोलकर, श्रीनिवास सौदागर, राजू पांगम, लक्ष्मण दिपनाईक, किशोर परब, शाम शेख, संजय तानावडे, भाऊ सातार्डेकर, श्रीपाद सामंत, सदानंद नवार, कादर दोस्ती, बाबा शिरसाट, संदीप मोरे,काका खोबरेकर, जयंत मोडकर, बाप्पा कोरगांवकर, राकेश सापळे, प्रभाकर आजगांवकर, दिपू वराडकर,बाबाजान मकानदार, जहीर शेख, सदा गिरप, उपेंद्र तोटकेकर, सदानंद पांजरी, संदीप गावडे, समाधान बांदवलकर, बाबा आरावंदेकर, राजेश शारबिदे, शैलेश गवंडे, विजय गावडे, सुधीर वाडकर, अतुल नेरुरकर,गौरेश कोरगांवकर, गजा परब, सौरभ पांजरी, अमेय खानोलकर, निलेश वाडकर, महेश प्रमुखानोलकर, सचिन पारकर, संदीप दिपनाईक आदींसह अन्य व्यापारी उपस्थित होते.
[24/08, 9:58 am] Samil Jalvi: आम्हाला भूलथापा मारून पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.;राजू राणे

कणकवली /-

आमचा ८०% समाजकारण व २०% राजकारण हा पिंड आहे. त्यामुळे आम्हाला भूलथापा आमिषे किंवा आश्वासने देऊन पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.ती तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना आहेत असे प्रत्युत्तर शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू राणे यांनी दिले आहे.
शिवसेनेने भाजपा कार्यकर्त्यांचा प्रवेश हा भूलथापा देऊन करून घेतला असल्याचा आरोप भाजपच्या वतीने झाल्यानंतर त्यांच्या आरोपांचे राजू राणे यांनी खंडन केले आहे. यावेळी भास्कर राणे, मारुती सावंत,गणेश राणे, रोहित राणे,उपस्थित होते
यावेळी बोलताना राजू राणे म्हणाले की, नुसती नावामागे पदे लावून नाही आमच्या एवढी हिम्मत आहे की गेल्या ३ वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मा.पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखालीआम्ही गावात आणून योग्य प्रकारे नियोजन करून पूर्ण करून घेतली.परंतु कावीळ झालेल्यांना सर्व पिवळेच दिसते.आपल्या नेत्यांकडून गावच्या विकासासाठी निधी न आणता किंवा आणलेल्या निधीचे कौतुक न करता झालेल्या विकास कामांवर तक्रारी करणे हेच तुमच्या आवडीचे काम . आम्हास ग्रामपंचायतीच्या आडून कामे करायची आवश्यकता आमच्यात समोरासमोर लढण्याची ताकत आहे. कामांच्या प्रति कशा प्रकारे आहेत याबाबत आपण तक्रारी केल्या नंतर संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या आहेत

आम्ही गेल्या 3 वर्षात विकास कामा व्यतिरिक्त बचत गटांना हळद रोपे, शेतकऱ्यांना काजू, बियाणे, खत वाटप असे विविध सामाजिक कार्य ही करत आहोत. हळवल गाव एक सुसंस्कृत गाव आहे .त्यामुळे कोण चांगले काम करतो त्यांच्या गाव नेहमी पाठीमागे राहतो.आता तुम्हीच विचार करा व मागे वळून पहा तुमच्या मागे किती आहेत.

किती कोणाला मतदान मिळेल हे गावातील सुज्ञ मतदार व ग्रामस्थ ठेवतील.घाणेरडे राजकारण करणे हा आमचा पिंड नाही त्यामुळे माझ्या हाताला धरून राजकारणात आलेल्यानी मला शिकवू नये ते कशाप्रकारे करायचे ते मला चांगले माहीत आहे. हे मी यापूर्वी दाखवून दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page