You are currently viewing नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला तुळस जि.प. मतदार संघातील कार्यकर्ते १५० मोटरसायकल सह रॅलीत सहभागी होणार

नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला तुळस जि.प. मतदार संघातील कार्यकर्ते १५० मोटरसायकल सह रॅलीत सहभागी होणार

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील तुळस जि.प. मतदार संघातील तुळस , मातोंड , होडावडा , वजराट , पेंडुर , पाल या गावातील कार्यकर्ते १५० मोटरसायकल घेऊन रॅलीत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले.तुळस येथील मराठे मंगल कार्यालयात आयोजित विभागीय बैठकीत नियोजन करण्यात आले . यावेळी प्रत्येक गावातील कार्यकर्ते आपापल्या भागातून गाडीला झेंडा बांधून मिरवणूकीने वेंगुर्ले येथील मानसी गार्डन येथे येऊन जन आशिर्वाद यात्रेमध्ये सामील होतील.वेंगुर्ले भाजपा च्या वतीने प्रत्येक जि.प. मतदार संघात बैठकीचे आयोजन करुन जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येत आहे . तसेच यात्रा यशस्वी करण्याकरता नियोजन करण्यात येत आहे .आजच्या या तुळस जि.प. गटाच्या बैठकीस जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , जिल्हा का.का.सदस्य मनिष दळवी , तुळस सरपंच शंकर घारे , ता.उपाध्यक्ष संतोष गावडे , वजराट ग्रा.पं. सरपंच महेश राणे , ता.चिटनीस नितिन चव्हाण , ता.का.का सदस्य रविंद्र शिरसाट , शक्ती केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर केळजी – संतोष शेटकर – कमलेश गावडे किसान मोर्चा चे बाळु प्रभु , बुथप्रमुख वसंत परब – प्रसाद मराठे – नितीन कोचरेकर – संदीप बेहेरे – जयवंत तुळसकर – शेखर परब – सुधीर भगत , माजी सरपंच श्रीनिवास मराठे , युवा मोर्चा चे नारायण कुंभार – रोहीत कुंभार आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..