You are currently viewing राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक यांच्याकडून शिवडाव-तांबटवाडी येथील पूरग्रस्त पाटील यांना मदत…

राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक यांच्याकडून शिवडाव-तांबटवाडी येथील पूरग्रस्त पाटील यांना मदत…

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील शिवडाव-तांबटवाडी येथील पुरात नुकसान झालेल्या चंदू पाटील यांना आज राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी मदतीचा हात दिला. यावेळी २ खाटा व गाद्या त्यांना मदत म्हणून देण्यात आल्या. दरम्यान साईनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा उपसरपंच सतीश पाताडे यांनी श्री. नाईक यांचे याकडे लक्ष वेधले होते.यावेळी शिवडाव उपसरपंच व साईनाथ सेवा मंडळ अध्यक्ष सतीश पाताडे, महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष स्नेहल पाताडे, तालुका राष्ट्रवादी प्रतिनिधी सचिन सदडेकर, सिद्धेश तानवडे, संदेश पाताडे, चंदू म्हसकर लखन पाटील व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी श्री. पाटील व गावातील सर्व लोकांनी अबिद नाईक यांचे आभार मानले. दरम्यान श्री. शिरसाठ व श्री. तानवडे यांच्या हस्ते या खाटा व गाद्या देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..