मा.नगरसेवक सचिन काळप यांच्या माध्यमातून लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांना कोरोनाचे १२० डोस उपलब्ध…

मा.नगरसेवक सचिन काळप यांच्या माध्यमातून लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांना कोरोनाचे १२० डोस उपलब्ध…

कुडाळ /-

कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांनी स्थानिक माजी.नगरसेवक श्री.सचिन काळप यांच्याजवळ मागणी केली होती.याची दखल घेत मा.नगरसेवक सचिन काळप यांनी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्याजवळ मागणी केली होती.ती मागणी आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ पूर्ण करून उद्द्या याचे दिनांक २४ ऑगस्ट रोजी १२० लसीचे डोस सुपूर्द केले जाणार आहेत. कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांच्या कोव्हिडं 19 च्या लसीकरण मागण्या पूर्ण केल्या आहेत.आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून हे १२० लसीचे डोस हे देण्यात आले आहेत.त्यामुळे लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांनी मा.नगरसेवक सचिन काळप आणि आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..