You are currently viewing युवा फोरम भारत संघटना च्या वर्धापनदिना निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर..

युवा फोरम भारत संघटना च्या वर्धापनदिना निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर..

मालवण /-

दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी कट्टा , मालवण येथे वाचन मंदिरात गुरामवाडी ग्रामपंचायत व सेवांगण या संस्थेच्या मदतीने युवा फोरम, भारत संघटना वर्धापन आठवड्याच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबवले. या शिबिरामध्ये डॉक्टर प्रीती पावसकर व डॉक्टर मृण्मयी परब या महिला डॉक्टरांचा सहकार्याने आम्हाला हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पाडता आले. या आरोग्य शिबिर मध्ये औषधांचा पुरवठा श्री स्वप्नील तेरसे यांनी केला. या कार्यक्रमाचे निवेदन खूप छान पद्धतीने सौ. सुजाता पावसकर यांनी उत्तमरीत्या केले. सेवांगण चे सदस्य श्री.किशोर शिरोडकर आणि बापू तळावडेकर व डॉक्टर सावंत यांनी ना चुकता उपस्थिती दर्शवली. युवा फोरम भारत संघटनेचे संघटना प्रमुख यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, संपर्क प्रमुख पूजा खानोलकर तसेच अभिषेक पावसकर रोहन करमळकर, विवेक राजमाने, शुभम सिंदगिकर, साईराज पावसकर, रोहन डांटस ,निधी जोशी,मिली मिश्रा, श्रीषा बांदिवडेकर, संतोषी घाडी, शुभम वेंगुर्लेकर हे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते व त्यांनी या कार्यक्रमाला मिळेल ते श्रम घेतले.

अभिप्राय द्या..