आडेली प्रभारी सरपंच संतोष कासले यांचे उपोषण स्थगित

आडेली प्रभारी सरपंच संतोष कासले यांचे उपोषण स्थगित

वेंगुर्ला /-


आडेली ग्रामपंचायत सरपंचा समिधा जनार्दन कुडाळकर यांच्या अनियमित गैरकारभाराची चौकशी होऊन आपत्रतेची कारवाई होणेबाबत प्रभारी सरपंच संतोष कासले यांनी वेंगुर्ले पं. स.कार्यालय येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता.याबाबत त्यांनी वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.दरम्यान प्राप्त निवेदनानुसार कार्यालयाकडील पत्रानवये सदरचा अहवाल जि.प.सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे,असे गटविकास अधिकारी यांनी कळविल्यामुळे उपोषण स्थगित केल्याची माहिती प्रभारी सरपंच संतोष कासले यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..