कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन..

कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन..

कुडाळ /-

व्यापारी वर्गासाठी कोविड १९ लसीकरण मुदत वाढवून मिळावी यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट व संघटना सदस्य यांनी आज १५ ऑगस्ट रोजी भेट घेऊन चर्चा केली आहे.कुडाळ तालुका व्यापारी संघटनेतर्फे दि. ०१/०७/२०२१ रोजी व्यापारी वर्गासाठी ऑफलाईन पध्दतीने लसीकरण करून मिळावी अशी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे मागणी करण्यात आली होती. परंतु त्याची अजून पर्यंत अमंलबजावणी झाली नाही. परंतु आता मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. १५/०८/२०२१ रोजी दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्यात येणार आहेत. सदर आदेशामध्ये आपण सर्व व्यापाऱ्यांना लसीकरणाचे दोन डोस घेणे बंधन कराक आहे. असा आदेश आहे जारी केला आहे. सद्य स्थिती पाहता जिल्ह्यात येणारा डोसचा पुरवठा कमी आहे. त्यात बहुतांश व्यापाऱ्यांनी पहिला लसीकरण डोस घेतलेला आहे. शासनाच्या नियमाने कोशिल्ड हा दुसरा डोस ८४ दिवसांनी घ्यावयाचा आहे.आपल्या आदेशामुळे सर्व व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे.मागील दिड वर्षे कोरोना महामारीमुळे सर्व व्यापारी आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. व्यापारी वर्गांचा व्यापार उर्जितावस्था व गणेशोस्तव येत असल्याने व्यापायांवर अशी सक्ती करू नये. तसेच सदर व्यापारी वर्गांसाठी पुढील सहा महिन्याची लसीकरण पूर्ण करण्याची मुदत द्यावी शासनाने व्यापारी वर्गासाठी लसीकरणासाठी वेगळे नियोजन करावे त्यासाठी लागणारी मदत आमची संघटना करेल अशी आमची कुडाळ तालुका संघटनेतर्फे विनंती आहे.तरी याची अमंलबजावणी व्हावी असे कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत याना निवेदन देत सांगितले आहे.यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्री राम शिरसाट यांच्या सोबत सचिव भूषण मटकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय भोगटे,संजय पडते, संदेश पडते, शार्दुल घुर्ये, चेतन पडते अन्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..