स्वातंत्र्य प्राप्तीत आणि स्वातंत्र्या नंतर देश उभारणीत काँग्रेसचेच योगदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

स्वातंत्र्य प्राप्तीत आणि स्वातंत्र्या नंतर देश उभारणीत काँग्रेसचेच योगदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

वेंगुर्ला /-


१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा इतिहास नव्या पिढी समोर आणण्यासाठी तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा. या उद्देशाने “व्यर्थ न हो बलिदान” हे अभियान सूरु करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट २०२१ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार मीठाचा सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला होता, त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसच होती. या देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले आणि स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाचे काम सुद्धा काँग्रेसने केले. २०१४ पर्यंत देशाला महासत्तेच्या उंबरठ्यावर आणुन ठेवण्याचे काम केंद्रात बराच काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारने केले. आता सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार गुण्यागोविंदाने नांदणा-या जनतेत फुट पाडून अराजकता माजवू पाहतय.त्यामुळे हा देश वाचवायचा असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे येणा-या काळात सर्व निवडणुका मध्ये काँग्रेस उभारी घेताना आपल्याला दिसेल.
यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांनी स्वातंत्र्य लढ्यातील व स्वातंत्र्या नंतरच्या राष्ट्र उभारणीतील काँग्रेसचे योगदान यावर सविस्तर माहिती दिली. तसेच महात्मा गांधीच्या मीठाचा सत्याग्रह ही स्वातंत्र्य लढ्याची फार मोठी चळवळ कशी उभी राहिली याचे विवेचन केले. देशांच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री,इंदिरा गांधी,राजीव गांधी यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली या देशाची प्रगती कशी केली. इंग्रजांनी आपल्या देशाला लुटून भिकारी केला होता ज्या देशात १९४७ मध्ये सुईचे सुद्धा उत्पादन होत नव्हते, त्या देशात अणुबाॅम्ब सुद्धा बनवला. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले. जगातील प्रगत देशांबरोबर अनेक बाबतीत स्पर्धा करणारा देश निर्माण केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस तालुकाप्रमुख विधाता सावंत यांनी केले तर आभार अमिदी मेस्त्री यांनी मानले. या प्रसंगी अरविंद मोंडकरच यांनीही आपले विचार मांडले.यावेळी चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य दादा परब,जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर,चंद्रशेखर जोशी,वेंंगुर्ले तालुका अध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी,सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, नगरसेविका कृतिका कुबल,नगरसेविका स्नेहल खोबरेकर,अभय शिरसाट,एन्. एस्. यु.आय.जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे,अरविंद मोंडकर,समिर वंजारी, विजय खाडे,सचिदानंद बुगडे,पांडुरंग नाटेकर,राघवेंद्र नार्वेकर,मंदार शिरसाट,योगेश्वर कुर्ले, कुडाळ महिला अध्यक्षा सुंदरवल्ली पडायची, सावंतवाडी महिला अध्यक्षा स्मिता वागळे, अमिदी मेस्त्री,जस्मीन लक्षमेश्वर, उत्तम चव्हाण,मयूर आरोलकर,किरण तांडेल,माया चिटणीस,रावजी परब,नितीन परब,सखाराम परब,प्रशांत परब,शांताराम मसूरकर,दिगंबर परब,विशाल गावडे,उत्तम शेट्ये,हायजीन फिलिप,जोसेफ डिसोझा,योगेश परब,विठ्ठल परब,यश परब,सुमीत राऊत, प्रणय मेस्त्री, अमृता मोंडकर,सुनिता राऊत,फिजा मकानदार,दिनेश गावडे,चिन्मय बांदेकर,महेश परब,रमाकांत परब,शशिकांत परब,गोविंद कुंभार,रुपेश आईर,आनंद कुंभार,अमित कुंभार,दिपाली राऊत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..