प.स सदस्य बाबू सावंत यांचे १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित..

प.स सदस्य बाबू सावंत यांचे १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित..

पावसाळ्यानंतर सोनूर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा रस्ता करण्याचे बांधकामने दिले लेखी पत्र..

सावंतवाडी /-

सोनुर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा या रस्त्याचे काम येत्या पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे , संबंधित रस्त्याला मंजुरी मिळाली असून टेंडर प्रक्रियाही पुर्ण झाली असल्याचे लेखी पत्र उपविभागीय अभियंता अनिल आवटी यांनी दिल्यानंतर पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी 15 ऑगस्ट रोजी पुकारलेले उपोषण मागे घेतले आहे, पावसाळ्यानंतर कामाला सुरवात न झाल्यास जनआंदोलन छेडणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. वेत्ये तिठा ते सोनुर्ली माऊली मंदिर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन वारंवार पाठपुरावा करूनही या दोन्ही रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांना घेऊन जनआंदोलन छेडण्यासाठी इशारा पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यानी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल आवटी यांना दिला होता.दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून सोनुर्ली देवी माऊली देवस्थान प्रसिद्ध आहे या ठिकाणी दररोज भक्तगण दर्शनासाठी येत असतात मात्र मंदिराकडे जाणारा न्हावेली तिठा ते सोनुर्ली माऊली मंदिर हा रस्ता पुर्णतः खड्डेमय झाल्याने या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण बनले आहे, सदर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केलेला आहे केवळ आश्वासन ना पलीकडे या विभागाकडून काहीच ठोस उत्तर मिळत नाही. सदरच्या रस्ता मंजूर असून केवळ प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे, रस्त्याच्या दुर्लक्षितेमुळे ग्रामस्थ तसेच येणाऱ्या भक्तगण कडून नाराजी व्यक्त होत असल्याने येत्या नोव्हेंबरमध्ये देवीची वार्षिक जत्रा होत आहे यापूर्वी या रस्त्याची डागडूजी होण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही व्हावी अन्यथा हा 15 ऑगस्ट नंतर ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण वजा जनआंदोलन करण्यात येईल अशा इशारा पंचायत समिती सदस्य श्री सावत यांनी दिला होता. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर बांधकाम चे श्री आवटी यांनी त्यांना लेखी पत्र देत सदर रस्ता मंजूर असून टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे मात्र अद्यापही कार्यारंभ आदेश देण्यात आला नसून येत्या पावसाळ्यानंतर सदर चा आदेश काढून सदर रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्याने ्हटले आहेत या लेखी आश्‍वासनानंतर श्री सावंत यांनी आपले उपोषण मागे घेतले

अभिप्राय द्या..