You are currently viewing देवगडात १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव.;सभापती रवी पाळेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन..

देवगडात १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव.;सभापती रवी पाळेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन..

देवगड /-

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाजी महोत्सव गुरुवार दिनांक १२ आॕगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कै. मो. ज. गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे नियोजित करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी आत्मा सल्ला समितीचे अध्यक्ष महेश पाटोळे यांनी दिली आहे.
 
रानभाजी महोत्सवात स्थानिक उपलब्ध होणाऱ्या भाज्या, ज्या पावसाळा सुरू झाल्यावर तयार होतात, त्या सर्व रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. रानभाज्यांचे आहारातील महत्व, त्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म यांची माहिती सर्वसामान्यांना मिळणार आहे. तसेच त्यांची पाककृती देखील पहायची संधी या रानभाजी महोत्सवात मिळेल.
 
या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती लक्ष्मण पाळेकर यांचे हस्ते होणार असून सिद्धांना म्हेत्रे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सिंधुदुर्ग) एस. एस. हजारे (उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली) व आत्मा शेतकरी सल्ला समिती देवगड सदस्य उपस्थित राहणार आहेत. रानभाजी विषयक सविस्तर माहिती देण्याकरीता रानभाजी तज्ज्ञ संदीप राणे उपस्थित राहणार आहेत. तरी सदर रानभाजी महोत्सवास देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी, ग्राहक यांनी भेट द्यावी, असे आवाहन महेश पाटोळे, अध्यक्ष शेतकरी सल्ला समिती यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..