You are currently viewing रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा अन्यथा सेना स्टाईल.;शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा ईशारा..

रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा अन्यथा सेना स्टाईल.;शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा ईशारा..

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रा. प. प्रशासनाचे लक्ष वेधून हि प्रशासन याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करता आहे. १५ ऑगस्ट पर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण न हटवल्यास शिवसेना स्टाईलने हे अतिक्रमण शिवसैनिक हटवतील. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी दिला आहे. दिगवळे रांजणवाडी येथील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत तहसीलदार आर जे पवार यांची भेट घेत याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, तालुका प्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, संदेश सावंत पटेल,प. स. सदस्य मंगेश सावंत, गोट्या कळसुळकर, सचिन सावंत, शरद वायंगणकर, आनंद आचरेकर, भोगले, आदी उपस्थित होते. सदर रस्त्याबाबत फेब्रुवारी २०२१ पासून ग्रामस्थ पाठपुरावा करुन रस्ता मोकळा करण्याबाबत आपल्या बरोबर पत्रव्यवहार करत आहेत. मात्र अद्यापही शासनाचे पैसे खर्च झालेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले गेले नाही, त्यामुळे या रस्त्यावरुन ये – जा करणाऱ्या ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले आहेत. गुरे – ढोरे, शेतसामान, रुग्णांची तसेच विद्यार्थ्याची, नागरिकांची ये – जा करणारा रस्ता बंद झाल्याने आणि आपल्या पातळीवर अद्यापही दखल घेतल्याने संबंधीत ग्रामस्थांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२१ पूर्वी आपण स्वतः प्रत्यक्ष येऊन किंवा प्रतिनीधी पाठवून सदर अतिक्रमण न हटविल्यास शिवसेना तालुका कणकवलीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सदर अतिक्रमण हटवतील आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपली जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी.

अभिप्राय द्या..