दोडामार्गात अवैद्य दारूचा २० लाखांच्या दारुसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..

दोडामार्गात अवैद्य दारूचा २० लाखांच्या दारुसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..

दोडामार्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्य|त पोलिसांनी चोरट्या दारू विक्रीच्या विरोधात चालू केलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे.मंगळवारी दोडामार्ग पोलिसांनी मोठी कामगिरी केली असच म्हणावं लागेल. एक ट्रक भरलेली सुमारे २० लाखांची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी या धडक मोहिमेत जप्त केली. ट्रकसह तब्बल 40 लाखांचा मुद्देमाल हाती लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गोवा – दोडामार्ग तपासणी नाक्यावरून जात असताना मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक आर जी नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, कुलदीप पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

अभिप्राय द्या..