You are currently viewing चिपळूण येथे मदतकार्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियन टीमचा आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार..

चिपळूण येथे मदतकार्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियन टीमचा आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार..

कणकवली /-

कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने चिपळूण येथे पुरग्रस्तांच्या घरात लाईट दुरुस्तीसाठी गेलेली १०० इलेक्ट्रिशियनची टीम दोन दिवस मदतकार्य करून आज रात्री कणकवलीत दाखल झाली. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी इलेक्ट्रिशियन यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे विशेष कौतुक करून भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. गेले दोन दिवस या टीमकडून चिपळूण येथील विविध भागात नागरिकांच्या घरांमध्ये लाईट दुरुस्तीचे काम अतिशय कमी कालावधीत करण्यात आले. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आल्याने चिपळूण वासियांनी देखील या मदतकार्याला प्रतिसाद देत आ. वैभव नाईक व कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटनेचे आभार मानले. यावेळी मालवण सरपंच संघटना अध्यक्ष नंदू गावडे, कुडाळ सरपंच संघटना अध्यक्ष सचिन कदम, पावशी सरपंच बाळा कोरगावकर,हुमरस सरपंच अनुप नाईक, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, नेरूर सरपंच शेखर गावडे, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली,रानबांबुळी सरपंच बांबूळकर, बाळा कांदळकर, सतीश नाईक, मंजुनाथ फडके, गोट्या चव्हाण, प्रमोद मसुरकर, रिमेश चव्हाण , संकेत शिंदे, गुरू मेस्त्री, व सर्व इलेक्ट्रिशियन उपस्थित होते.

अभिप्राय द्या..