वेंगुर्लेतील सागरतीर्थ गाबीतवाडी येथील खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू..

वेंगुर्लेतील सागरतीर्थ गाबीतवाडी येथील खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू..

वेंगुर्ला /-

मासेमारीसाठी गेलेल्या खलाशाचा होडीतून तोल जावून समुद्रात पडल्यामुळे मृत्यू झाला.अनिल जीवबा तांडेल रा. सागरतीर्थ गाबीतवाडी असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की सागरतीर्थ येथून होडी घेवून श्रीकांत विष्णू प्रभू यांच्यासह अनिल तांडेल व अन्य खलाशी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. सुमारे अडीज ते तीन किलोमीटर समुद्रात पुढे गेल्यानंतर अचानक तोल जाऊन अनिल तांडेल समुद्राच्या पाण्यात पडले. काही वेळातच इतर सहकारी खलाशांनी त्याला पाण्यामधून बाहेर काढून होडीत घेतले. तसेच तात्काळ त्याला किनाऱ्यावर आणून उपचारासाठी शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तांडेल मृत झाले असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी घोषित केले.

दरम्यान याप्रकरणी श्रीकांत प्रभू यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्हि. दळवी करीत आहेत.

अभिप्राय द्या..