You are currently viewing मनसे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश उर्फ गुरु भालेकर यांचे निधन..

मनसे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश उर्फ गुरु भालेकर यांचे निधन..

कणकवली /-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश शिवाजी उर्फ गुरु भालेकर (वय 50,रा. फोंडाघाट) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,तीन मुलगे, काका ,काकी असा परिवार आहे. मनसेच्या कणकवली तालुक्यातील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उपतालुकाध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली होती. यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे उपविभाग प्रमुखपद देखील भूषविलेले होते.माजी आम. परशुराम उपरकर यांचे ते खंदे समर्थक होते. सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे, सामाजिक, राजकीयभान असणारे एक प्रामाणिक कार्यकर्ते होते.

अभिप्राय द्या..