You are currently viewing गोठोसचे माजी सैनिक यांचे दुःखद निधन..

गोठोसचे माजी सैनिक यांचे दुःखद निधन..

कुडाळ /-


गोठोस गावचे पूर्वीचे रहिवासी आणि आता निवजे येथे स्थायिक झालेले माजी सैनिक श्री.भागोजी बापू वरक (मामा) यांचे काल सायंकाळी 6.00 वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. श्री वरक यांनी भारतीय सीमेवर सेवा देऊन देशवासीयांची सेवा केली. परिसरात ते मामा म्हणुन परिचित होते. गेली अनेक वर्ष गोठोस गावामध्ये सामाजिक बांधिलकीतून त्यांनी अनेक कामे केली, त्यांनी येथील भजन मंडळासाठी आर्थिक योगदान दिले होते.अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. श्री.वरक यांच्या जाण्याने गोठोस वासीयांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.

अभिप्राय द्या..