You are currently viewing आपत्तीग्रस्त जाधव कुटुंबियांना शासनाकडून चार लाखांची मदत…

आपत्तीग्रस्त जाधव कुटुंबियांना शासनाकडून चार लाखांची मदत…

कणकवली /-

23 जुलै च्या अतिवृष्टीत कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथील जाधव कुटुंबियांच्या घरावर दरड कोसळून प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर पती प्रकाश जाधव हे गंभीर जखमी झाले होते. मृत प्रमिला यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता तर जखमी प्रकाश याना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीत प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाल्यामुळे शासन नियमानुसार त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांनी तात्काळ शासन स्तरावर प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मयत प्रमिला जाधव यांचा मुलगा प्रमोद याच्याकडे 4 लाख रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.

अभिप्राय द्या..