आश्वासन फोल म्हणून प्रवीण गवस रुग्णवाहिकेसाठी पुन्हा करणार उपोषण..

आश्वासन फोल म्हणून प्रवीण गवस रुग्णवाहिकेसाठी पुन्हा करणार उपोषण..

दोडामार्ग /-

गेल्या अनेक वर्षांपासून साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्र येथे सर्व सोयीयुक्त अशी रूग्णवाहीका मिळाली पाहिजे अशी मागणी होती माजी पालकमंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका दिली जाईल हे सांगितले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत रुग्णवाहिका दिल्या पण साटेली भेडशी येथे रुग्णवाहिका मिळाली पाहिजे यासाठी गेल्या महिन्यात पंचायत समिती कार्यालय येथे प्रविण गवस याने दोडामार्ग पंचायत समिती कार्यालय येथे उपोषण केले होते, पण दिलेले आश्वासन हवेतच विरले त्यामुळे गवस यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्र याला ग्रामिण भागातील गावे जोडली आहेत येथे जी गाडी आहे. ती नादूरुस्त आहे. त्यामुळे येथे नवीन गाडीची गरज आहे. यासाठी पालकमंत्री खासदार, आमदार, यांच्याकडे मागणी केली होती शिवाय २५ जून रोजी दोडामार्ग पंचायत समिती कार्यालय येथे उपोषण देखील झाले होते यावेळी पंधरा दिवसांत गाडी दिली जाईल असे त्यांनी सांगितले पण अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नाही.प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्र आवारात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अभिप्राय द्या..