निवती येथील एअरगन आणि साॅ-कटर चोरल्या प्रकरणी दोघा युवकांना अटक.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

निवती येथील एअरगन आणि साॅ-कटर चोरल्या प्रकरणी दोघा युवकांना अटक.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /-

निवती येथे झालेल्या चोरी प्रकरणी कुडाळ पोलिसांनी काल रात्री दोघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिनार दिलीप खानविलकर (२४),रा. पिंगुळी-सराफदारवाडी व विशाल सुरेश वाडेकर (२२) रा.आवेरे-वेंगुर्ले, अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी एअरगन आणि साॅ-कटरची चोरी केली. हा प्रकार काल उघड झाल्यानंतर याप्रकरणी त्यांच्या विरोधात सुर्यकांत जगन्नाथ भोवळे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार त्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

अभिप्राय द्या..