कणकवली तालुक्यातील पूरग्रस्तासांठी राष्ट्रवादी आरोग्य मेळावा..

कणकवली तालुक्यातील पूरग्रस्तासांठी राष्ट्रवादी आरोग्य मेळावा..

कणकवली /-

कणकवली पीसेकामटे कातकरी वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व डॉक्टर्स सेल प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कातकरी वस्तीत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल, कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुग्णांची मोफत तपासणी करून डॉ. संजीव लिंगवत, डॉ. शिवाजी चव्हाण, डॉ. दत्त प्रसाद पवार, डॉ.रक्षंदा घाडी, डॉ. सम्रुद्धी देसाई यांनी औषधोपचार केले.
यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, उपजिल्हाध्यक्ष अनंत पीळणकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, कुडाळ नगरसेवक सर्फराज नाईक, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, अखंड लोकमंचचे नामानंद मोडक, शैलजा कदम, समीर आचरेकर, सागर वारंग, सतीश जाधव, अजय जाधव, ऍड. जयराज सावंत, देवेंद्र पिळणकर, सुजय शेलार आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..