You are currently viewing पर्यायी व्यवस्था म्हणून भाजी विक्रेत्यांना जागा देणार ; नगराध्यक्षा साळसकर

पर्यायी व्यवस्था म्हणून भाजी विक्रेत्यांना जागा देणार ; नगराध्यक्षा साळसकर

देवगड /-

कोरोना संक्रमण काळात आठवडा बाजार बंद असले तरी अत्यावश्यक भाजीपाला, फळे घेऊन येणारे बाहेरील व्यापारी यांची आठवडा बाजार दिवशीची पर्यायी व्यवस्था त्याच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून करून देण्यात येईल. त्यांनी आर्टिपीसीएल टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसेच त्यांची रॅपिड टेस्ट ही केली जाणार आहे. स्थानिक भाजी विक्रेते यांच्या मागणीनुसार बाहेरील भाजी व्यापाऱ्यांनी सोमवार ते गुरुवार या कालावधीत येऊ नये, अशी सूचनाही करीत आहोत. त्यांनी तसेच आठवडा बाजार ठिकाणी स्थानिक भाजी विक्रेते बसणार असतील त्यांचीही व्यवस्था कोरोनाचे नियम पाळून केली जाईल. परंतु या सर्व व्यापाऱ्यांनी वजन, माप काटे तसेच आवश्यक तो परवाना घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी देवगड नगरपंचायत सभागृहात बोलताना केले.

देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील फळ भाजी विक्री नियोजन करणे, यावर विचारविनिमय करण्याकरिता देवगड जामसंडे नगरपंचायतच्या वतीने विशेष सभेचे आयोजन गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष प्रियांका साळसकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होते. या सभेला उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, सभापती बापू जुवाटकर, प्राजक्ता घाडी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, प्रणाली माने, नगरसेवक नीरज घाडी, सुभाष धुरी, ज्ञानेश्वर खवळे, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, उमेश स्वामी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, शिवसेना उपतालुका प्रमुख बुवा तारी, शहर प्रमुख संतोष तारी, विभाग प्रमुख तुषार पेडणेकर, राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, सचिव जगदीश जाधव, शहर विकास आघाडी अध्यक्ष निशिकांत साटम, भाजी फळ विक्री संघटना प्रतिनिधी राजू पाटील व अन्य व्यापारी संघ प्रतिनिधी प्रमोद नलावडे, मधुकर नलावडे, गुरुनाथ मोर्ये, दयाळ गावकर, अनिल खडपकर उपस्थित होते.

उद्योगपती नंदकुमार घाटे, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष निशिकांत साटम, मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री, राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बुवा तारी, बाळ खडपे, प्रमोद नलावडे, योगेश चांदोस्कर, दयाळ गावकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. एकंदरीत फळ भाजी विक्री नियोजन बैठकीमधून योग्य तो निर्णय झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

अभिप्राय द्या..