देवगड तालुक्यातील पत्रकार अतुल गाडगीळ यांचे निधन..

देवगड तालुक्यातील पत्रकार अतुल गाडगीळ यांचे निधन..

देवगड /-

ज्येष्ठ पत्रकार व देवगड तालुक्यातील फणसे गावचे रहिवाशी अतुल शशिकांत गाडगिळ (46) यांचे मुंबई सानपाडा येथे दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ,भावजया असा परिवार आहे. अतुल गाडगीळ हे गेली 20 वर्षाहून अधिक काळ ते पत्रकारितेमध्ये होते त्यांची पत्रकारीची सुरुवात देवगड येथील सकाळ मधून झाली होती. त्यानंतर त्यांनी दै. तरुण भारत, दै. लोकमत, दै. प्रहार, दै. पुढारी या वृत्तपत्रामध्ये काम केले आहे. दै. लोकमत मध्ये त्यांनी सिंधुदुर्ग आवृती प्रमुखपदी देखील काम केले होते. बुधवारी त्यांचे मुंबई सानपाडा येथे दुखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सिंधुदुर्ग कोल्हापुर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पत्रकरितेचे काम केले होते. सध्या ते मुंबई सानपाडा येथील दै. पुढारी मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहत होते.

अभिप्राय द्या..