कलमठ येथील निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन..

कलमठ येथील निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन..

कणकवली /-

कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. ते सरंबळ इग्लिश स्कूल व कुडाळ येथे शिक्षक म्हणून काम करून सेवा निवृत्त झाले होते. त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभाग असायचा. शांत व हसतमुख स्वभामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कलमठ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले.

अभिप्राय द्या..