You are currently viewing कळणे येथील नुकसानग्रस्त वासीयांना पर्वरी विजनरीज गोवा संस्था व मित्रपरिवारा मार्फत करण्यात आली मदत…

कळणे येथील नुकसानग्रस्त वासीयांना पर्वरी विजनरीज गोवा संस्था व मित्रपरिवारा मार्फत करण्यात आली मदत…

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनींग मध्ये भूस्खलन होवून मायनींगची चिखलमय माती सह दूषित पाणी कळणे वासीयांनच्या घरात शिरले असता येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले असून घरातील धान्य तसेच अत्यावश्यक सर्व साधने खराब झाल्याने येथील लोकवस्थीची दयनीय अवस्था झाली असून या आपत्ती मुळे अनेक घरातील चूल अशक्य असल्याने आता खायचे तरी असा प्रश्न कळणे वासीयांन समोर उभा असून हे लक्षात घेता पर्वरी विजनरीज गोवा संस्था व मित्र परिवाराने येथील नुकसानग्रस्त कळणे वासीयांना जीवणपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यांनी सामाजिक बांधिलकी करत त्यांनी ही मदत केली असून यावेळीसंस्था प्रमुख मिहीर आगशिकर,अनिल म्हारदोळकर, सावियो, शशी, साईदत्त, जॅस्पर, डेस्मण्ड, महेश, डेसी इत्यादी उपस्थित असून दोडामार्ग मधील सामाजिक कार्यकर्ते चंदन गांवकर,निलेश टोपले,मिलिंद नाईक,सुधीर नाईक, मनोज पार्सेकर, भगवान गवस यांच्या सहयोगातून वरील मदत करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा