मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांचा प्रकल्प..

कणकवली /-

वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी दिलासा दिला आहे.मालवण पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवला आहे वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी हा ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर उपयोगी ठरणार आहे कणकवली तालुक्यातील हळवल या गावी राहणारे शरद दशरथ जाधव ,सुमेध प्रमोद कासले पॉलीटेक्निक मालवण व सुमेध दशरथ जाधव आय टी आय ओरस या तिघांच्या संकल्पनेतू हा मिनी ट्रॅक्टर बनवण्यात आला आहे याला बनवण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागला असून हा एकदा चार्ज केल्यावर तीस किलोमीटर धावू शकतो व याची प्रवासी क्षमता तीनशे किलो पर्यंत आहे . हा ट्रॅक्टर बनविण्यासाठी तिघांना अंदाजे 35 ते 37 हजार पर्यंत खर्च आला आहे मालवण पॉलिटेक्निक मधील शेवटच्या वर्षातील 14 विद्यार्थ्यांच्या ग्रूप च्या मदतीने हा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे हा बनवण्यासाठी विशेष योगदान मालवण पॉलिटेक्निक कॉलेजचे सिंग सर,योगेश महाडिक, कणकवलीत एसटी आगारातील दशरथ कृष्णा जाधव विजतत्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पुढील काळात हा मिनी ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी उपयोग होऊ शकतो कणकवली एसटी आगारात हा मिनी ट्रॅक्टर आणला असता एसटी कर्मचारी दशरथ कृष्णा जाधव, प्रमोद यादव डेपो मॅनेजर , प्रकाश मयेकर गौरेश लोकरे ,गितेश कडू, इतर एसटी कर्मचाऱ्यांनी ही त्यांचे कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page